भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ? -संपादक
न्यूयॉर्क (अमेरिका) – म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये रोहिंग्या मुसलमानांची संघटना ‘अराकान रिव्होल्युशन आर्मी’ आणि म्यानमारचे सैन्य यांच्यातील संघर्षाच्या वेळी रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केले होते. या हत्या एक आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवला जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्याने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांकडून म्यानमारमधील हिंसाचाराचे अन्वेषण केले जात आहे. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा (इंडिपेडंट इन्व्हेस्टिगेशन फॉर म्यानमार – आय.आय.एम्.एम्.) स्थापन करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या प्रमुखाने वरील माहिती दिली.
आय.आय.एम्.एम्.चे प्रमुख निकोलस कौमजियन यांना पत्रकारांनी हिंदूंच्या हत्यांविषयी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेने वर्ष २०१८ मध्ये बनवलेल्या अहवालाविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ९९ लोकांना ठार करण्याची घटना गंभीर आहे. त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. या संदर्भात म्यानमारमध्ये आम्हाला अन्वेषण करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात