नंदुरबार (महाराष्ट्र) – येथे श्री मोठा मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी उद्योजक श्री. नितेश अग्रवाल, श्री मोठा मारुति मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. अशोकअण्णा चौधरी, श्री. रवींद्र पवार, श्री कल्याण पाटील, तसेच माजी सैनिक श्री. अरविंद निकम यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. पुरोहित श्री. विलास जोशी यांनी मंत्रोच्चार केले.
विजयादशमीचे महत्त्व सांगण्यात आले. हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा श्री. आकाश गावित यांनी घेतली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नरेंद्र तांबोळी, श्री. देवा कासार, श्री. दिग्विजय ठाकरे, हिंदु सेवा साहाय्य समितीचे श्री. नरेंद्र पाटील, विविध हिंदु संघटनांचे पदाधिकारी आणि महिला यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी सर्वश्री सुमित परदेशी, आकाश गावित, हर्षल देसाई, जितेंद्र मराठे यांनी नियोजन केले.