Menu Close

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

निपाणी येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’द्वारे सरकारकडे मागणी

निपाणी येथील ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती’ आंदोलनात मनोगत व्‍यक्‍त करतांना श्री. किरण दुसे

निपाणी (कर्नाटक) – तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्‍टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याचा) गुन्‍हा नोंदवून या सर्वांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. हे आंदोलन निपाणी येथे कित्तूर राणी चनम्‍मा चौक येथे २५ ऑक्‍टोबरला करण्‍यात आले. या प्रसंगी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्‍थित होते. तहसीलदार एम्.एन्. बाळीगार यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले.

निपाणी येथील ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती’ आंदोलनात मनोगत व्‍यक्‍त करतांना श्री. अमोल चेंडके

या प्रसंगी वारकरी महासंघाचे ह.भ.प. बाबूराव महाजन महाराज म्‍हणाले, ‘‘सनातन धर्मावर स्‍वार्थी राजकारणी मतांच्‍या राजकारणासाठी द्वेषपूर्ण विधान करत आहेत. ते बंद करावे.’’ बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. अजित पारळे म्‍हणाले, ‘‘हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या हलाल अर्थव्‍यवस्‍थेला मान्‍यता देऊ नये; अन्‍यथा बजरंग दल या विरोधात रस्‍त्‍यावर उतरेल.’’ या प्रसंगी हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. अभिनंदन भोसले, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे, ‘सद़्‍गुरु तायक्‍वांदो स्‍पोर्टस् अ‍ॅकॅडमी’चे संस्‍थापक श्री. बबन निर्मळे यांनीही त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.

निपाणी येथील ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती’ आंदोलनात तहसीलदार एम्.एन्. बाळीगार यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

या प्रसंगी ‘सिद्धांत हेल्‍थ क्‍लब’चे श्री. राजू हिंग्‍लजे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. राजेश आवटे, श्रीराम सेनेचे श्री. सचिन तावदारे, जोतिषाचार्य प्रसाद जोशी, धर्मप्रेमी श्री. प्रवीण सूर्यवंशी, बजरंग दलाचे श्री. सुयोग कल्लोळे, हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री राजू सुतार, रोहन राऊत, राजू कल्लोळे, विठ्ठल कोगले, आप्‍पासाहेब जबडे, सचिन प्रताप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल वैष्‍णव आणि श्री. अनिल बुडके यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *