Menu Close

हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन – दानिश कनेरिया

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांची स्पष्टोक्ती !

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया

नवी देहली – मला हिंदु असण्याचा अभिमान आहे. मी हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन, असे विधान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. कनेरिया जेव्हा पाक संघात खेळत होते, तेव्हा त्यांच्या सहकारी मुसलमान खेळाडूंकडून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर कनेरिया यांनी वरील उत्तर दिले.

सौजन्य: The Economic Times

मुलाखतीत दानिश कनेरिया यांनी मांडलेली सूत्रे !

१.  भगवान श्रीरामाच्या जीवनातून आपण शिकतो की, प्रत्येक परिस्थितीमध्ये संघर्ष करत राहिले पाहिजे, कधीही हार मानू नये. भगवान श्रीरामाने शिकवण दिली आहे की, जर तुमचा विश्‍वास अढळ असेल, तर वाईटातील वाईट परिस्थितीही पालटते.

२. भारतात क्रिकेट सामन्यांच्या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात येत असण्यावर ते म्हणाले की, ‘जय श्रीराम’ची घोषणा एखाद्याचे स्वागत करण्यासाठी दिली जाते. यावर जे कुणी वाद घालत आहेत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाकिस्तानमधील स्टेडियमजवळ असलेल्या मशिदींवरून अजानचे आवाज येत असतात, त्यावर कुणीच आक्षेप घेत नाही.

३. प्रभु श्रीरामाने बोलवले, तर अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरात सहकुटुंब दर्शनासाठी नक्कीच येईन.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *