Menu Close

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन

हिंदुविरोधी घोषणाही दिल्या !

  • जिहादी आतंकवादी संघटना हमासच्या नेत्याला ऑनलाईन सभेत आमंत्रित करून त्याला मार्गदर्शन करण्यास सांगणार्‍या केरळमधील इस्लामी संघटनेवर बंदी घातली पाहिजे ! अशी कीड आताच चिरडून टाकली पाहिजे !
  • अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे ! -संपादक
हमासचा नेता खालिद मशाल

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात मुसलमानांनी २७ ऑक्टोबर या दिवशी ऑनलाईन सभा आयोजित केली होती. या सभेला हमासचा नेता खालिद मशाल याने मार्गदर्शन केले. या सभेत खालीद याने हिंदुविरोधी घोषणाबाजी केल्याचेही दिसून आले.

१. खालिद याने उपस्थित मुसलमानांना हमासच्या आतंकवाद्यांना विनाअट समर्थन देण्याचे आवाहन केले. त्यावरून मुसलमानांनी हमासला समर्थन देण्याची शपथ घेतली. खालिद याने ७ मिनिटे मार्गदर्शन केले.

२. या सभेमध्ये ‘बुलडोझर हिंदुत्व उखडून फेका’ अशा घोषणा देण्यात आल्या. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगल घडवणार्‍या धर्मांधांची अनधिकृत घरे पाडली. त्यामुळे त्यांना ‘बाबा बुलडोझर’ असे म्हटले जाते. या पार्श्‍वभूमीवर या घोषणा देण्यात आल्या.

३. ही सभा ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेच्या ‘सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंट’ या युवा शाखेने आयोजित केली होती. यापूर्वी या युवा संघटनेने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ फेर्‍याही काढल्या आहेत. या सभेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर टीका होऊ लागली आहे.

भाजपकडून टीका

या सभेवरून भाजपने केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारवर टीका केली आहे. केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रम् यांनी ‘मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचे पोलीस कुठे आहेत ? हमासचा नेता सभेला मार्गदर्शन करतो, ही पुष्कळ चिंताजनक गोष्ट आहे. पॅलेस्टाईनच्या लोकांना वाचवण्याच्या नावाखाली आतंकवाद्यांचे समर्थन केले जात आहे. आतंकवादी संघटना हमास आणि तिच्या नेत्यांचे गुणगान केले जात आहे. त्यांना योद्ध्यांच्या रूपात दाखवले जात आहे’, अशी टीका केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *