Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ !

डावीकडून पू. प्रदीप खेमका, सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, पू. ब्रह्मचारी गौरव, श्री. शंभू गवारे आणि श्री. धनंजय रायपत

कतरास (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे हेही उपस्‍थित होते.

१. कतरास येथे ‘तणावमुक्‍तीसाठी अध्‍यात्‍म’ विषयावर प्रवचन

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी कतरास येथील खेमका भवनमध्‍ये  ‘तणावमुक्‍तीसाठी अध्‍यात्‍म’, विषयावर उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सनातन संस्‍थेचे पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्‍थिती होती. या कार्यक्रमाचा लाभ कतरासमधील अनेक उद्योगपतींनी घेतला.

२. रांची येथे प्रतिष्‍ठितांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

रांची येथील ‘हॉटेल ग्रीन होरायझन’ येथे रांची येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘रांची गुजराती समाजा’चे अध्‍यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांच्‍या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ श्री कच्‍छ गुर्जर क्षत्रिय समाजाचे अध्‍यक्ष सूर्यकांत राठोड, पटेल समाजाचे अध्‍यक्ष गाबू पटेल, पटेल समाजाचे हरि पटेल, झारखंडबिहार माहेश्‍वरी सभेचे अध्‍यक्ष राजकुमार मारू, कोषाध्‍यक्ष शिव शंकर साबू यांच्‍यासह गुजराती समाज, पटेल समाज, माहेश्‍वरी समाज आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला. याही कार्यक्रमाला सनातन संस्‍थेचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.

रांची येथील प्रसिद्ध उद्योजकांना हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या भीषणतेची जाणीव करून देऊन त्‍यांच्‍यात जागृती करतांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

३. झुमरा, हजारीबाग येथे प्रवचनांचे आयोजन

झुमरा, हजारीबाग येथील पंचायत भवनामध्‍ये प्रवचनाचे आयोजन करण्‍यात आले. हे आयोजन सर्वश्री अजित कुमार यादव, गौतम सिंह आणि पिंकू भुईयान यांनी केले. यासमवेत ‘बोकारो चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्री’च्‍या सभागृहामध्‍ये श्री. रंजित कुमार सिंंह यांनी प्रवचनाचे आयोजन केले.

४. विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने हजारीबाग जिल्‍ह्यातील ठाकूरबाडी मंदिर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेत सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उपस्‍थितांना हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या भीषणतेची जाणीव करून दिली. या सभेत १०० हून अधिक लोक सहभागी झाले होते.

५. रांची (झारखंड) आणि कोलकाता (बंगाल) हिंदु राष्‍ट्र-जागृती बैठक

रांची येथील ‘हॉटेल ग्रीन होरायझन’मध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती बैठक’ पार पडली. यात धर्मप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला. कोलकाता येथील बडा बाजार वाचनालय येथेही अशीच बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत हुगळी, हावडा आणि कोलकाता येथील अनेक संघटना सहभागी झाल्‍या होत्‍या. या बैठकीत सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सर्व संघटनांनी एकत्रितपणे कार्य करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.

६. वैयक्‍तिक संपर्क

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी रांची येथील परमहंस योगानंद पथावर वसलेल्‍या ‘योगदा सत्‍संग मठा’चे पू. ब्रह्मचारी गौरव यांची सदिच्‍छा भेट घेतली. या वेळी पू. प्रदीप खेमका उपस्‍थित होते. पू. ब्रह्मचारी गौरव यांनी सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आणि पू. खेमका यांना मठात चालू असलेल्‍या सेवाकार्याविषयी माहिती दिली. या भेटीचे नियोजन प्रसिद्ध उद्योजक श्री. धनंजय रायपत यांनी केले.

यासमवेतच सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी प्रसिद्ध उद्योजक तथा रांची गुजराती समाजाचे अध्‍यक्ष चंद्रकांत रायपत, झारखंड-बिहार माहेश्‍वरी सभेचे अध्‍यक्ष राजकुमार मारू, कोषाध्‍यक्ष शिव शंकर साबू, कोलकाता येथील श्री. विमल जैस्‍वाल यांच्‍या सदिच्‍छा भेटी घेतल्‍या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *