Menu Close

ज्यू मुलांच्या हत्यांविषयी जगाचे मौन – इस्रायल

इस्रायलकडून संयुक्त राष्ट्रांच्या दुटप्पीपणाची चिरफाड !

इस्रायलचे राजदूत गिलड एर्दान

न्यूयॉर्क (अमेरिका) – दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी नाझींनी ज्यू मुलांच्या हत्या केल्या, तेव्हा संपूर्ण जग शांत होते आणि आज इस्रायलमध्ये हमासकडून ज्यू मुलांच्या हत्या केल्या गेल्या, तेव्हाही जग शांतच आहे; मात्र जेव्हा तुम्ही माझ्याकडे पहाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या मौनाची लाज वाटेल, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांतील इस्रायलचे राजदूत गिलड एर्दान यांनी सुनावले. संयुक्त राष्ट्रांमध्ये गाझावर इस्रायलकडून केल्या जाणार्‍या आक्रमणाला विरोध करणारा, तसेच युद्धविराम करण्याची मागणी करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यावर टीका करतांना एर्दान बोलत होते.

एर्दान यांनी त्यांच्या भाषणात मांडलेली सूत्रे

हमास नव्या काळातील नाझी !

हमास नव्या काळातील नाझी आहे. हमास अमानवीय हिंसा करत असून तिला ज्यूंना नष्ट करायचे आहे. हमासला समस्या सोडवायची नाही. ती चर्चा करण्यात रस दाखवत नाही. हमासचा प्रमुख इस्माइल हानिया हा हिटलर नाही. लोकांना ठार मारणारा हानिया हा उत्तरदायी नाही, तर इराणचा प्रमुख अयातुल्ला खामेनेई हा उत्तरदायी आहे. खामेनेई संपूर्ण जगावर राज्य करू इच्छित आहे. तो या क्षेत्रात आणि अन्यत्र कट्टरतावादी शिया समाजाचे साम्राज्य निर्माण करू इच्छित आहे. खामेनेईचे शासन या काळातही नाझींचे शासन आहे. त्याच्या सैन्यात हमास, इस्लामिक जिहाद, हिजबुल्ला, हुती यांसारख्या जिहादी संघटना सहभागी आहेत. त्या इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटन यांना नष्ट करण्याच्या घोषणा देतात.

संयुक्त राष्ट्रांच्या मौनामुळे शत्रूंचे फावत आहे !

संयुक्त राष्ट्रांच्या मौनामुळे शत्रूंचे फावत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील त्या प्रस्तावाचे कौतुक झाले, ज्यामध्ये आम्हाला आमचे रक्षण करण्यावर प्रतिबंध लादण्याचा विचार होता. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने तर असे म्हटले, ‘गाझावरील आक्रमण नाझींकडून झालेल्या नरसंहाराप्रमाणे आहे.’ यातून शत्रूला हे लक्षात आले की, हमासने  ज्यू मुलांना जरी ठार मारले, तरी जग शांतच रहाणार आहे. यामुळेच ते त्यांना असे करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

आम्ही हमासला चिरडून टाकू !

संयुक्त राष्ट्रे जरी मौन बाळगून असली, तरी इस्रायल स्वतःचे रक्षण करत रहाणार आहे. इस्रायलच्या लोकांना तोडता येणार नाही, ते देश सोडून कुठेही जाणार नाहीत. आम्ही हमासला चिरडून ओलिसांची सुटका करून त्यांना घरी आणू.

संयुक्त राष्ट्रे गेल्या ८० वर्षांत काहीच शिकली नाहीत !

गिलाड एर्दान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलतांना घातलेल्या कपड्यावर पिवळ्या रंगाचा तारा असलेला बिल्ला लावला होता. त्यावर इंग्रजित ‘नेव्हर अगेन’ (पुन्हा कधीच नाही) असे लिहिले होते. ‘जोपर्यंत संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद हमासच्या आक्रमणाचे निषेध करत नाही, तोपर्यंत मी हा बिल्ला लावणार आहे. येथे उपस्थित सर्व जण हे विसरले आहेत की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना का झाली आहे ? गेल्या ८० ते काहीच शिकलेले नाहीत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *