Menu Close

पॅरिसमध्ये ‘तुम्ही सर्व मरणार’ असे ओरडणार्‍या हिजाबधारी महिलेवर पोलिसांनी केला गोळीबार !

अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) म्हणत मेट्रो स्थानकावर लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न !

पॅरिस (फ्रान्स) – इस्रायल-हमास यांच्यात चालू झालेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमान आणि ज्यू लोक मोठ्या प्रमाणात रहात असलेलया फ्रान्समध्ये संभाव्य आक्रमणे होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ७ आक्टोबरपासून देशात ८१९ ज्यूविरोधी घटना घडल्या असून ४१४ लोकांना अटक करण्यात आल्याचे तेथील गृहमंत्री गेराल्ड डार्मानिन यांनी सांगितले. अशातच ३१ ऑक्टोबर या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने ‘तुम्ही सर्व मरणार’ अशा प्रकारे ओरडण्यास आरंभ केला. या वेळी ती ‘अल्लाहू अकबर’ असेही म्हणत होती. मेट्रो स्थानकावरील लोकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी महिलेवर गोळीबार केला. या वेळी महिलेच्या पोटात गोळी घुसल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर उपचार केले जात आहेत. तिच्याकडे कोणतेही शस्त्र नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेविषयी माहिती मिळताच पोलीस बिबलियोथेक फ्रान्सुआ मितरँड स्थानकात पोचले. या वेळी त्यांनी महिलेला खाली बसण्याचा आदेश दिला. तरीही ती घोषणाबाजी चालू ठेवत त्यांच्या दिशेने येऊ लागली. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या आरास शहरात एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या आक्रमणात त्याचा शिक्षकाचा मृत्यू झाला होता. या वेळी विद्यार्थीही अल्लाहू अकबर म्हणत होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *