हमासच्या जिहादी विचारसरणीवर बोट ठेवण्याचे धाडस जोली का करत नाहीत ? -संपादक
कोलंबिया (अमेरिका) – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी गाझावरील नागरी आक्रमणाविषयी इस्रायलचा निषेध केला आहे. गाझावरील आक्रमणाचे वर्णन करतांना जोली म्हणाल्या, ‘अडकलेल्या लोकांवर जाणूनबुजून केलेली ही बाँबफेक होय. लाखो पॅलेस्टिनी नागरिकांना एकत्रितपणे शिक्षा केली जात आहे नि अमानवीय वागणूक दिली जात आहे !’ जागतिक नेत्यांनी युद्धबंदीचे आवाहन करण्यास नकार देऊन ही समस्या अधिक जटील करून टाकली आहे, असा आरोपही जोली यांनी केला आहे.
ऑस्कर विजेत्या अभिनेत्री अँजेलिना जोली संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्यूजीज’साठी विशेष दूत म्हणून गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. ३० ऑक्टोबरला जोली यांनी हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या आक्रमणास आतंकवादी कृत्य संबोधिले होते, परंतु त्या वेळीही त्या म्हणाल्या होत्या की, याचा अर्थ असा नाही की, याची शिक्षा गाझात रहाणार्या नागरिकांना देण्यात यावी.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात