Menu Close

दवर्ली (मडगाव, गोवा) येथील मशिदीवरील भोंगे हटवा – श्री दुर्गामाता मंदिर समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

गेले ८ मास तक्रारी केल्यावर केवळ आश्वासन; मात्र कारवाई नाही !

  • धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन !
  • कोळसा वाहतुकीमुळे होणार्‍या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्‍या आणि समुद्रकिनार्‍यांवरील पार्ट्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ? -संपादक 
प्रातिनिधिक छायाचित्र

मडगाव (गोवा) : दवर्ली येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी दवर्ली येथील श्री दुर्गामाता मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी २ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत, तसेच दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी ६ नोव्हेंबर या दिवशी एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीतून समस्येवर तोडगा निघणार असल्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेले ८ मास मशिदीतून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात श्री दुर्गामाता मंदिर समिती संघर्ष करत आहे; मात्र अजूनही ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही.

जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर श्री दुर्गामाता मंदिर समितीचे पदाधिकारी

जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीनंतर पत्रकारांना श्री दुर्गामाता मंदिर समितीचे अध्यक्ष रजनीकांत तेंडुलकर म्हणाले, ‘‘दवर्ली येथील मशिदीतून कानठळ्या बसणारा आवाज येत असतो. मंदिराच्या आरतीच्या वेळी मशिदीतील भोंगा चालू असतो. याचा त्रास सर्व परिसराला होत असतो. याविषयी यापूर्वी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवण्यात आली होती आणि तक्रारीची कार्यालयाने नोंद घेतली होती; मात्र ध्वनीप्रदूषण बंद झाले नाही. तक्रारीनंतर शासन किंवा पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. ध्वनीप्रदूषणावर कारवाई होण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात हेलपाटे मारण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी कारवाईचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात कोणतीच कृती होत नाही. याविषयी स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांची भेट घेतली असता त्यांनी याविषयी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना संपर्क साधला. पोलीस अधीक्षकांनी ध्वनीप्रदूषण बंद करणार असल्याचे म्हटले आहे. वास्तविक ‘सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीतून होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर कारवाई व्हावी’, असे आमचे मत आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे आणि ध्वनीप्रदूषणातून आमची सुटका करावी.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *