Menu Close

भारतात मशिदींतून गोळा केलेल्या पैशांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर !

‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेच्या अहवालातील माहिती !

  • ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असा टाहो फोडणारे काँग्रेसी ‘भगवा आतंकवाद’ नावाने हिंदूंना गुन्हेगार ठरवतात. आता हिंदूंनी ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या या अहवालावरून काँग्रेसींना जाब विचारला पाहिजे !
  • धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या विद्यमान भारतीय व्यवस्थेद्वारे जिहादी आतंकवादाची पाळंमुळं खणून काढणे अशक्य आहे ! यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! -संपादक 

नवी देहली – आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ म्हणजेच ‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ (समाजाला पैसे देण्याचे आवाहन करून तो पैसा आतंकवाद वाढवण्यासाठी वापरणे) नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालाच्या पृष्ठ क्रमांक ३८ वर भारतीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारतातील एका कट्टरतावादी संघटनेने नियोजनबद्धरित्या जाळे विणून संपूर्ण देशातून पैसे एकत्रित केले. मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना दान देण्याचा आग्रह करून प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन पद्धतीने पैसे एकत्र करण्यात आले. यासाठी ३ सहस्र बँक खात्यांचा वापर करण्यात आला. लोकांना ‘क्यूआर् कोड’ आणि बँक खाती यांची माहिती देऊन पैसे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. यांद्वारे जमा झालेले पैसे शस्त्रास्त्रे खरेदी करणे आणि आतंकवादी निर्माण करणे, यांसाठी वापरण्यात येत आहेत.

Risk-Indicators-Crowdfunding-Terrorism-Financing-Violent-Extremism

या अहवालात संबंधित संघटनेचे नाव नमूद केलेले नसले, तरी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही संघटना म्हणजे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) असल्याचे म्हटले आहे. या जिहादी आतंकवादी संघटनेवर गेल्या वर्षी केंद्रशासनाने बंदी घातली आहे. या पैशांतून नियमित उत्पन्न मिळण्यासाठी भूमी खरेदी-विक्री, तसेच अन्य व्यवसायांमध्ये हा पैसा गुंतवण्यात आला. या प्रकरणी ८ कट्टरतावाद्यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासह त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये हस्तगत करण्यात आल्याचे ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *