Menu Close

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे विनोद यांची वाहिनी यूट्यूबने अन्यायकारकरित्या बंद केल्यावर ‘भारत का ओटीटी’ चालू !

हिंदूंच्या विरोधात रचण्यात येणार्‍या षड्यंत्राचा भांडाफोड करणार्‍या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या संघटनेच्या या महत्त्वपूर्ण पावलासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! हिंदु पुनरुत्थानासाठी कार्यरत अशा संघटनाच हिंदु धर्माच्या वास्तविक शक्ती होत ! – संपादक 

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ चे प्रमुख श्री. विनोद (छायाचित्र सौजन्य: स्ट्रिंग जिओ)

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख श्री. विनोद यांनी दिली. ‘स्ट्रिंग जिओ’ या नावाने चालू करण्यात आलेल्या या ओटीटीला विनोद यांनी ‘भारत का ओटीटी’ असे संबोधले. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) नुकताच एक व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली.

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ नावाचे यूट्यूब चॅनल गेल्या काही वर्षांपासून हिंदूंवर होणार्‍या जागतिक षड्यंत्रांमागे कोण आहे ?, हे सोदाहरण स्पष्ट करून सांगत आहे. या चॅनलचे १४ लाखांहून अधिक अनुयायी (सबस्क्रायबर्स) होते; परंतु यूट्यूबने या चॅनलवर सप्टेंबर २०२३ मध्ये एकाएकी बंदी आणली. त्यानंतर या संघटनेने आता त्यांचे दुसरे ओटीटी चालू केले आहे.

या व्हिडिओमध्ये श्री. विनोद यांनी म्हटले आहे की,

१. भारतभूमी ही श्रेष्ठ गुरु, आश्रम आणि मंदिरे यांनी पावन झालेली भूमी असून येथील आश्रमांमध्ये तुम्हाला सर्वोच्च आनंद अन् जीवनाचा वास्तविक अर्थ सापडतो. आता असे आश्रम आणि मंदिरे यांना नष्ट करण्याचा कुटिल डाव मनात बाळगणारे लोक सापडले, तर तुम्ही सांगा आपण काय करायला हवे ?

२. आज ऑनलाईन प्रसारमाध्यमांमध्ये (‘डिजिटल मीडिया’मध्ये) मोठ्या प्रमाणात अशा लोकांचा भरणा आहे. मोठ्या वाहिन्या चुकीची माहिती देतात. कथित समाजसेवक धार्मिक आवाज मोठा होऊ देत नाहीत. ते आपला बुद्धीभेद करू पहातात आणि आतंकवाद्यांना मोठे करण्याचा प्रयत्न करतात.

३. हिंदूंना अंधारात ठेवण्यासाठी आणि आपल्यामध्ये दास्यत्वाची मानसिकता रूढ करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. या गोष्टींचा समाचार घेण्यासाठी मी हे ‘ओटीटी’ चालू केले आहे.

४. आपल्या देवतांचे विडंबन करणारे, गुरूंवर आगपाखड करणारे, भारतीय संस्कृतीला अवमानित करणारे यांना योग्य भाषेत समज देणे आवश्यक आहे. या ओटीटीचा त्यासाठीही वापर होणार आहे.

५. भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठीही या ओटीटीचा वापर करू शकता. येथे चांगल्या वेब सीरिज, लघुपट, पॉडकास्ट आणि चित्रपट यांच्या माध्यमातून तुम्हाला आपली संस्कृती समजून घेता येणार आहे.

६. जसे वेद हे ब्राह्मणांसाठी आवश्यक आहेत, गुरु हे अज्ञानी जिवांसाठी मार्गदर्शक आहेत, तसेच ‘स्ट्रिंग जिओ’ हे सनातन धर्मावर आक्रमण करणार्‍या पापी राक्षसांचा चेहरा उघडा पाडण्यासाठी आवश्यक माध्यम आहे.

७. तुम्हाला कितीतरी गोष्टी नेटफ्लिक्स, अमॅझॉन, गूगल आदींवर सापडणार नाही; परंतु आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ.

हिंदूंवरील अत्याचारांचे व्हिडिओ आम्हाला पाठवा, आम्ही त्यास प्रसिद्धी देऊ !

यूट्यूबने माझे चॅनल काढून टाकले. आतापर्यंत मी एकटा विनोद होतो; परंतु आता मी शेकडो ‘स्ट्रिंग विनोद’च्या रूपात तुमच्यासमोर येणार आहे. हे तुमचे ओटीटी आहे, भारताचे ओटीटी आहे. तुम्ही येथे तुमचे मत मांडू शकता. हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर झालेला अन्याय अन् अत्याचार यांचे व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा. हे जनतेचे, राष्ट्राचे, भारताचे ओटीटी आहे.

‘स्ट्रिंग जिओ’ची माहिती !

  • ‘ओटीटी’चा पत्ता : www.stringgeo.com
  • कोणत्या भाषांत आहे ? : हिंदी, इंग्रजी, तेलुगु आणि तमिळ
  • ‘बेसिक’ शुल्क : प्रतिमास ९९ रुपये (यात केवळ ‘एक्सक्ल्यूझिव अ‍ॅक्सेस’ नसेल)
  • ‘स्टँडर्ड’ शुल्क : प्रतिमास २९९ रुपये (यात ‘एक्सक्ल्यूझिव अ‍ॅक्सेस’ असेल)
  • ‘प्रिमियम’ शुल्क : प्रतिमास ३९९ रुपये (यात ‘एक्सक्ल्यूझिव अ‍ॅक्सेस’ असेल)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *