Menu Close

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ३१० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु धर्म स्वीकारला. त्यांचे येथे सामूहिकरित्या वैदिक विधींद्वारे शुद्धीकरण करण्यात आले. या लोकांमध्ये मुले, महिला आणि वृद्ध यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘संत रविदास धर्म रक्षा समिती’कडून करण्यात आले होते. ख्रिस्त्यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी राजेंद्र चौहान या पाद्य्राने गावातील लोकांचे धर्मांतर केले होते. हे सर्व जण अनुसूचित जातीमधील होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *