पुष्कर (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीची पुष्कर पुरोहित संघाच्या पदाधिकार्यांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या धर्मकार्याविषयी मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी माहिती दिली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समितीकडून चालू असलेल्या प्रयत्नांविषयी श्री. भंवरसिंग राठोड यांनी सर्वांना माहिती दिली. ‘समितीच्या धर्मशिक्षणाच्या कार्याने प्रभावित होऊन पुष्करमधील सर्व पुजार्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न करू’, असा अभिप्राय पुरोहित संघाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. या वेळी सर्वश्री बालकिशन पाराशर, मधुसूदनजी पाराशर, सूरज पाराशर, राकेश पाराशर, गिरीराज पाराशर, बैद्यनाथ पाराशर, आशिष पाराशर आणि सुदर्शन इंदोरिया आदी उपस्थित होते.
पुष्करतीर्थ (राजस्थान) येथील पुरोहित संघाच्या पदाधिकार्यांची हिंदु जनजागृती समितीसह बैठक
Tags : Hindu Janajagruti Samiti