Menu Close

पराक्रमी योद़्‍ध्‍यांकडून धर्माचरणाचे महत्त्व शिकणे आवश्‍यक – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अजमेर (राजस्‍थान) येथील राजपूत वसतीगृहामध्‍ये विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन

श्री. आनंद जाखोटिया

अजमेर (राजस्‍थान) – महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्‍ध्‍यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्‍यांना जीवनातील दैवी शक्‍तीचे महत्त्व ठाऊक होते. त्‍याप्रमाणे आपणही हिंदु असल्‍याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्‍यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश अन् राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील राजपूत वसतिगृहामध्‍ये विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री. भंवरसिंग राठोड यांनी फ्‍लेक्‍स प्रदर्शनाद्वारे उपस्‍थितांना धर्मशिक्षणाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी राजपूत वसतिगृहाचे सर्वश्री सुकरसिंग शेखावत, महावीरसिंह गौड, भेरुसिंह राठोड, नरेंद्रसिंह राठोड यांचे सहकार्य लाभले.

श्री. जाखोटिया पुढे म्‍हणाले, ‘‘ऋषिमुनींनी आपल्‍याला धर्माचरणाची शिकवण दिली. त्‍यावर आता संशोधन केले जात आहे. या धर्माचरणाचे सकारात्‍मक लाभ वैज्ञानिक चाचण्‍यांमध्‍ये समोर येत आहेत. आजच्‍या धकाधकीच्‍या परिस्‍थितीत आपण आपल्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी आणि सकारात्‍मक रहाण्‍यासाठी आध्‍यात्‍मिक साधना केली पाहिजे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *