Menu Close

धर्मशास्‍त्र समजून घेऊन आचरण करा – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अजमेर (राजस्‍थान) येथे प्रवचनाचे आयोजन

श्री. आनंद जाखोटिया

अजमेर (राजस्‍थान) – सध्‍या आपण सणांमागील धर्मशास्‍त्र विसरत चाललो आहोत. त्‍यामुळे सणांचे मूळ स्‍वरूप नष्‍ट झाले असून केवळ मनोरंजनासाठीच सण पहावयास मिळत आहेत. सध्‍या नवरात्रीमध्‍ये देवीच्‍या पूजनापेक्षा दांडिया कार्यक्रमांना अधिक महत्त्व दिले जात आहे. आजकाल दिवाळी ही फटाके आणि मिठाई यांसाठीच ओळखली जाऊ लागली आहे. त्‍यामुळे धर्मग्रंथ समजून घेणे, ते येणार्‍या पिढ्यांना सांगणे आणि शास्‍त्रानुसार सण साजरे करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शास्‍त्री कॉलनीतील श्री सोमनाथ धाम मंदिरामध्‍ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी घेतला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मंदिराचे महंत श्री श्री १००८ योगी गोवर्धननाथ महाराज यांची वंदनीय उपस्‍थिती होती. या वेळी समितीचे श्री. भंवरसिंग राठोड यांनी समितीच्‍या धर्मशिक्षण फलकांची माहिती उपस्‍थितांना दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *