Menu Close

युरोपमधील साम्यवादी विचारवंत झिझेक याने श्रीमद्भगवतगीतेला ‘जगातील अश्‍लील पुस्तक’ संबोधले

नवी देहली – युरोपमधील स्लोवेनिया देशातील साम्यवादी विचारवंत स्लाgवोज झिझेक यांनी श्रीभगवद्भगवतगीतेविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ ‘इयर ऑफ दि क्रॅकेन’ या एक्स खात्यावरून प्रसारित करण्यात आला आहे.  यात झिझेक यांनी गीतेला ‘जगातील सर्वांत अश्‍लील आणि घृणास्पद धार्मिक पुस्तकांपैकी एक’ म्हटले आहे.

‘ओपनहायमर’ चित्रपटातील दृश्यावरून केली टीका !

‘ओपनहायमर’ चित्रपटातील शारीरिक संबंधाच्या एका दृश्याच्या वेळी कलाकारांच्या शेजारी श्रीमद्भगवदगीता दाखवण्यात आली होती. या दृश्यावरून स्लावोज यांनी टीका करतांना म्हटले, ‘या दृश्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. घाणेरडी अश्‍लील कृती करतांना बाजूला भगवद्गीता दाखवल्यामुळे भारतियांनी संताप व्यक्त केला होता. मी त्यांच्याशी सहमत आहे; मात्र अगदी उलट अर्थाने. प्रेमसंबंधांसारखी सुंदर कृती करतांनाचा क्षण ते मध्येच हे घाणेरडे पवित्र पुस्तक वाचून वाया घालवतात.’

नाझी अधिकार्‍याने केलेल्या नरसंहारामागे भगवद्गीता असल्याचा दावा

झिझेक यांनी असेही म्हटले आहे की, कुप्रसिद्ध नाझी अधिकारी हेनरिक हिमलर हे कायम स्वतःसमवेत गीतेची प्रत ठेवत होते. जेव्हा हिमलर यांना विचारले जात की ‘तुम्ही अगदी भयानक कृत्य करत आहोत. तुम्ही महिला आणि लहान मुले यांना मारत आहात. तुम्ही मानव असून असे कसे करू शकता ? त्यावर त्यांचे उत्तर एकच होते, ‘श्रीमद्भगवदगीता’!

स्रोत : हिंदी सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *