‘सेल्फी पॉईंट’ला एक सहस्रपेक्षा अधिक नागरिकांनी दिली भेट
लांजा – दीपावली म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर शौर्य प्राप्त केलेला आनंदाचा उत्सव. दुष्प्रवृत्तीचा नाश क्षात्रतेजानेच केला जातो. प्रत्येक हिंदुला वाटत असते की, पुन्हा एकदा आम्ही अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करू. जसे ज्यु धर्मियांनी २ सहस्र वर्षानंतर इस्रायल पुन्हा स्थापन केले. तसाच विचार अखंडपणे तेवत रहाण्यासाठी, त्या विचाराप्रमाणे कृतीप्रवण होण्यासाठी येथील हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’(स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढण्याचे ठिकाण)च्या स्वरूपात ‘न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय’च्या समोर साकारण्यात आला होता. या ‘सेल्फी पॉईंट’ला येथील १ सहस्रपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. या वेळी छायाचित्र काढतांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारतमातेचा विजय असो’ आणि अन्य घोषणा दिल्या.
या ‘सेल्फी पॉईंट’ला आमदार राजन साळवी, माजी नगराध्यक्ष श्री. मनोहर बाईत, अनेक नगरसेवक आणि येथील प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार राजन साळवी यांना अधिवक्ता रूपेश गांगण यांनी विनंती केली की, आपण विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी हिंदु राष्ट्राची मागणी करावी आणि त्याचा पाठपुरावा करावा. त्यावर आमदार राजन साळवी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
या वेळी व्यापारी असोसिएशनचे श्री. मिलिंद उपशेट्ये म्हणाले की, अनोखा असा उपक्रम आहे. यामध्ये प्रत्येकाला आपल्या देशाविषयी भावना व्यक्त करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले. अनेकांना आपण एकाच विचाराने प्रेरित आहोत हेही त्यामुळे लक्षात येईल. असेच सगळे संघटित झाल्यास हिंदु राष्ट्राची पहाट दूर नाही.
स्रोत : सनातन प्रभात