Menu Close

श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च

घटनेमागील ‘मास्टरमाइंड’ शोधून काढण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

राहुरी तालुक्यातील (जि. अहिल्या नगर) गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानात ऐन दिवाळीत धर्मांध दंगलखोरांनी धुमाकूळ घातला. दीपावलीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालू असतांना अचानकपणे धर्मांध जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’ असे म्हणत मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली आणि तेथे चालू असलेली पूजा आणि भजन बंद पाडले. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पूजा-भजने बंद पाडून हिंदूंना मारहाण केली जात आहे, ही घटना मोगलाईची आठवण करून देणारी आहे. या घटनेचा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना कायदा हातात घेऊन ऐनदिवाळीत हिंदूंवर आक्रमण करणे, अतिशय गंभीर आहे. हे काय कमी होते, म्हणून ५८ हिंदूंवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदूंवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, तसेच गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे काही षड्यंत्र आहे का, या घटनेमागे कोण ‘मास्टरमाइंड’ आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केली आहे.

‘अहमदनगर’चे नाव बदलून मंदिरांचे जतन-संवर्धन करणार्‍या अहिल्याबाईंच्या नावाने ‘अहिल्यानगर’ केले असले, तरी अद्याप तेथील ‘अहमदा’च्या वंशजांची प्रवृत्ती बदललेली नाही. या गावात मंदिराच्या बाजूला बेकायदेशीरपणे दर्गा निर्माण करून मंदिराची ३२ एकर जागा ‘वक्फ बोर्डा’च्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तसेच येथे नियमित दर गुरुवारी, तसेच दर अमावास्येला नित्य पूजाअर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे, असेही ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *