Menu Close

सुनील घनवट यांच्‍या कोल्‍हापूर जिल्‍हा दौर्‍यात १ सहस्रांहून अधिक हिंदूंचा धर्मकार्य करण्‍याचा निर्धार !

कोल्‍हापूर शहर येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन येथे झालेल्‍या कार्यक्रमात उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

कोल्‍हापूर – हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्‍या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत २ ते ६ नोव्‍हेंबर या कालावधीत कोल्‍हापूर जिल्‍ह्यात, तसेच कर्नाटकातील निपाणी, संकेश्‍वर येथे जाहीर व्‍याख्‍याने घेण्‍यात आली, तसेच विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ, संत, मान्‍यवर यांच्‍या भेटी घेण्‍यात आल्‍या. या दौर्‍यात १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी धर्मकार्य करण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त केला.

१. कोल्‍हापूर शहर येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन, लकी बझार येथे आयोजित कार्यक्रमासाठी ३५० हिंदूंची उपस्‍थिती होती. या प्रसंगी सनातन संस्‍थेचे पू. सदाशिव परब, ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. पराग फडणीस, ह.भ.प. विठ्ठलतात्‍या पाटील, भ्रष्‍टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्‍थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे जिल्‍हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, श्री. रामभाऊ मेथे, स्‍वातंत्र्यवीर सावरकर साहित्‍य आणि विज्ञान मंडळाचे अध्‍यक्ष श्री. नितीन वाडेकर उपस्‍थित होते.

२. इचलकरंजी येथे झालेल्‍या कार्यक्रमासाठी सौ. नीता परिख, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. विवेक स्‍वामी, श्री. अनिल साळुंखे, पृथ्‍वीराज मुद़्‍गल, ह.भ.प. दीपक महाराज बरगाले, सर्वश्री बसवराज कलबुर्गी, राम पाटील, भीमराव कोंडुस्‍कर यांसह ९० जिज्ञासू उपस्‍थित होते.

३. गडहिंग्‍लज येथे झालेल्‍या कार्यक्रमासाठी व्‍यापारी श्री. कुमार वंटमुरे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. सागर कुराडे, शिवसेनेचे श्री. संजय संकपाळ, माजी पंचायत समिती सभापती वर्षा बागडी, वारकरी संप्रदायचे श्री. विश्‍वास बुगडे यांसह १५० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते.

४. मलाकापूर येथे झालेल्‍या कार्यक्रमात श्री. सुनील घनवट यांनी विशाळगडाच्‍या संदर्भात तेथील अतिक्रमणाच्‍या विरोधात चालू असलेला लढा, सद्यस्‍थिती यांची माहिती दिली. येथे १५० धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

५. निपाणी (कर्नाटक) येथे झालेल्‍या कार्यक्रमासाठी या प्रसंगी ‘गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमी’चे संस्‍थापक श्री. चारुदत्त पावले, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. अजित पारळे, श्रीराम सेना कर्नाटकचे श्री. अमोल चेंडके, धर्मप्रेमी सर्वश्री मलगौडा हरदारे, बाळासाहेब हिरुगडे, मल्लिकार्जुन जोगड, विशाल पुणेकर, आप्‍पासो जबडे यांसह १३० जिज्ञासू, हिंदुत्‍वनिष्‍ठ, धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

६. आजरा, संकेश्‍वर (कर्नाटक), तसेच कोल्‍हापूर शहर येथे हॉटेल इंटरनॅशनल येथेही धर्मप्रेमींच्‍या बैठका घेण्‍यात आल्‍या. येथेही ‘हिंदूंनी प्रत्‍यक्ष कृती करू’, असे सांगितले.

७. सर्वच ठिकाणी झालेल्‍या कार्यक्रमांनंतर सनातन धर्माच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषयुक्‍त भाषण) देणार्‍यांच्‍या विरोधात तक्रार देण्‍याचे ठरवण्‍यात आले आणि त्‍याप्रमाणे तक्रारी देण्‍यात आल्‍या.

कोल्‍हापूर शहर येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन येथे झालेल्‍या कार्यक्रमात घोषणा देतांना धर्मप्रेमी, हिंदुत्‍वनिष्‍ठ, जिज्ञासू
इचलकरंजी येथील कार्यक्रमासाठी उपस्‍थित धर्मप्रेमी हिंदू
गडहिंग्‍लज येथील कार्यक्रमासाठी उपस्‍थित धर्मप्रेमी हिंदू
मलकापूर येथील कार्यक्रमासाठी उपस्‍थित धर्मप्रेमी हिंदू
कोल्‍हापूर शहर येथे ‘हॉटेल इंटरनॅशनल’ येथे झालेल्‍या कार्यक्रमात जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *