Menu Close

चीनने पाकिस्तानला कायम साथ दिली असली तरी इस्लामबाबत त्यांचे म्हणणे खपवून घेणार नाही : हाफिज सईद

Hafiz_Saeedलाहोर : सतत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या चीनला मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने इस्लामच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले आहेत. ‘चीनने पाकिस्तानला कायम साथ दिली असली तरी इस्लामबाबत त्यांचे म्हणणे खपवून घेणार नाही’, असे सईदने स्पष्ट केलं आहे.

‘इस्लामचे अनुकरण करू नका त्यापेक्षा मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंब करा’, असे चीनमधील वरिष्ठ नेतृत्त्वाने देशवासियांना नुकतेच ठणकावून सांगितले होते. यावरूनच हाफिज सईदने चीनला सुनावले आहे.

‘चीनने पाकिस्तानला सर्व परिस्थितीत साथ दिली आहे. पण अशी कुठलीही टिप्पणी जी आमच्या इस्लाम धर्माला ठेच पोहचवत असेल ती आम्ही खपवून घेणार नाही. चिनी नेतृत्त्वाने आपले म्हणणे मागे घ्यावे. अशा प्रकारे वक्तव्य करून चीन पाकिस्तानशी असलेले मैत्रीचे संबंध बिघडवत आहे’, असे सईदने सांगितले.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *