Menu Close

‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची तयारी करणार्‍या मा. योगी आदित्यनाथ यांचे अभिमंदन – हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षडयंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांच्या नावाखाली त्या उत्पादनांना बेकायदेशीरपणे सर्टिफिकेशन दिले जात असल्याविषयी तक्रार उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांनी तत्परतेने दखल घेत कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे, असे वृत्त आहे. याबद्दल हिंदु जनजागृती समिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍यांवर कारवाई होऊन देशाची सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी आशा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केली.

श्री. शिंदे यांनी केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ अर्थात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय्.’ ही सरकारी प्रमाणन संस्था आणि प्रत्येक राज्याची ‘अन्न आणि औषधी प्रशासन’ ही व्यवस्था अस्तित्त्वात असतांना धार्मिक आधारावर ‘हलाल प्रमाणिकरण’ करणार्‍या बेकायदेशीर संस्थांची नोंदणी रहित करावी, अशी मागणी या निमित्ताने केली. श्री. शिंदे पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ मांस हे ‘हलाल’ मिळत असे. आता विविध खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्य प्रसाधनांपासून हाऊसिंग कॉप्लेक्स, टुरिझम, मॉल आदी अनेक क्षेत्रांत ‘हलाल प्रमाणिकरण’ चालू झाले आहे. भारतात रहाणार्‍या १४ टक्के मुसलमानांसाठी, ८६ टक्के मुसलमानेतर समाजाला (हिंदु, शीख, जैन, बौद्ध आदी) त्यांच्या इच्छेविरूद्ध ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने विकण्यात येत आहेत. हे अत्यंत गंभीर असून ही एकप्रकारे धार्मिक बळजोरी आहे. हिंदु जनजागृती समिती याविषयी अनेक वर्षांपासून जनजागृती करत आहे. समितीने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित करून आणि मोठ्या प्रमाणात आंदोलने करून या समस्येला सर्वप्रथम वाचा फोडली. हलाल अर्थव्यवस्थेद्वारे भारतविरोधी कारवायांना आर्थिक बळ पुरवण्याचे षड्यंत्र देखील समितीने उघड केले. याची दखल मा. योगीजी यांनी घेतली आणि कारवाईचे सूतोवाच केले आहेत, हे अभिनंदनीय असून त्यांचे देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांनी अनुकरण करायला हवे, असेही श्री. शिंदे यांनी या वेळी म्हटले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *