दापोली आणि खेड येथील मंदिर विश्वस्त बैठकीला सकारात्मक प्रतिसाद
दापोली – मंदिरांच्या विरोधात एका बाजूला धर्मांध, सेक्युलरवादी, पुरोगामी यांच्या आघाड्या काम करत आहेत. वक्फ कायद्याचा अपलाभ घेत मंदिरे, मंदिरांच्या भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसर्या बाजूला सुव्यवस्थापनाच्या नावाखाली मंदिरांच्या संपत्तीची लूट चालू आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरातील साडेचार लाखांहून मंदिरांचे सरकारीकरण झाले; मात्र एकाही मशीद ,चर्चचे सरकारीकरण झालेले नाही. मंदिर संस्कृती रक्षणासाठी आता हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यसमन्वयक श्री. सुनील घनवट यांनी २० नोव्हेंबर या दिवशी शहरातील जालगाव-ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत केले. या बैठकीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या बैठकीचे सूत्रसंचालन समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी केले.
या वेळी सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, आपण मंदिराचे रक्षण करण्यासाठी संघटित होणे महत्त्वाचे आहे, तसेच पुणे येथे होणार्या मंदिर परिषदेसाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
महालक्ष्मी देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. सुरेश रेवाळे म्हणाले की, मंदिर विश्वस्तांचे तालुकास्तरावरील अधिवेशन होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील विश्वस्तांचे संघटन करणे सोपे जाईल.
खेड येथील श्री पाथरजाईदेवी मंदिराच्या सभागृहात मंदिर विश्वस्तांची बैठक
२० नोव्हेंबर या दिवशी शहरातील श्री पाथरजाईदेवी मंदिराच्या सभागृहात मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समितीचे श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, तसेच शहरातील श्री खेडजाई, रेडजाई, जाखमाता देवस्थानचे विश्वस्त श्री. संतोष दांडेकर, श्री पाथरजाईदेवी देवस्थानचे माजी अध्यक्ष श्री. विनोद पाटणे, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शेटये पाटणे, श्री लक्ष्मी नारायण देवस्थानचे कार्यवाहक श्री. सुरेंद्र जोशी, श्री शिवमंदिर खांबतळे देवस्थानचे सदस्य श्री. गोपाळ करवा, श्री साई मंदिराचे विश्वस्त श्री. समीर पाटणे, श्री. अमित लढ्ढा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड आणि श्री. शिवाजी सालेकर उपस्थित होते.