मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई – उत्तरप्रदेश येथे योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, हलाल उत्पादनांच्या साहाय्याने देशाचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. इस्लामिक संघटनेने ८० टक्के उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली आहे. हलाल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घेतलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवले जात असल्याचे कळताच योगी आदित्यनाथ यांनी हलाल उत्पादनांवर बंदी आणली. हिंदु धर्मात ‘हलाल उत्पादने’ अशुभ मानली जातात; परंतु इस्लामिक संघटना दबाव आणून प्रत्येक उत्पादनावर हलाल प्रमाणपत्र मिळवून दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, तसेच ज्या उत्पादनांवर हलाल लिहिलेले आहे, ती उत्पादने खरेदी करू नयेत, असे आवाहनही निवेदनाच्या माध्यमातून हिंदूंना करण्यात आले आहे.
स्रोत : सनातन प्रभात