Menu Close

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी – श्रेथा थाविसिनी, पंतप्रधान, थायलंड

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिनी यांचा वर्ल्ड हिंदु काँग्रेसमध्ये संदेश !

  • जगात अशांतता निर्माण करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी तितकेच प्रयत्न करणे आवश्यक आहे !
  • हिंदु धर्माची महानता थायलंडच्या पंतप्रधानांना कळते; मात्र भारतातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक
श्री. श्रेथा थाविसिनी

बँकॉक (थायलंड) – अशांततेशी झगडणार्‍या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा थाविसिनी यांनी येथे आयोजित तिसर्‍या वर्ल्ड हिंदु काँग्रेससाठी दिला. हा संदेश उद्घाटनाच्या सत्रात वाचून दाखवण्यात आला. पंतप्रधान श्रेथा स्वतः या परिषदेत उपस्थित रहाणार होते; मात्र काही अपरिहार्य करणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

(सौजन्य World Affairs by Unacademy)

या संदेशात पंतप्रधान श्रेथा थाविसिनी यांनी पुढे म्हटले की, हिंदु धर्माचे सिद्धांत आणि मूल्ये, यांवर आयोजित वर्ल्ड हिंदु काँग्रेसचे आयोजन करणे, ही आमच्या देशासाठी सन्मानाची गोष्ट आहे. थायलंड आणि भारत यांच्यातील भौगोलिक अंतर कितीही असले, तरी हिंदु धर्मातील सत्य अन् सहिष्णुता या मूल्यांचा नेहमीच आदर केला गेला आहे. जगामध्ये हिंदूंची ‘एक प्रगतीशील आणि प्रतिभासंपन्न समाज’ अशी ओळख स्थापित करण्याच्या उद्देशानेच या भव्य परिषदेस प्रारंभ झाला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *