Menu Close

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

५ वर्षांनंतर लागला निकाल !

  • हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयीचा खटला ५ वर्षे चालत असेल, तर अशा प्रकारचा अवमान करणार्‍यांवर वचक कसा बसणार ?
  • पाकिस्तानमध्ये अल्लाचा अवमान करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते; भारतातही हिंदूंच्या देवतांच्या अवमानासाठी अशीच शिक्षा करायला हवी ! -संपादक

वलसाड (गुजरात) – येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. १७ सप्टेंबर २०१८ या दिवशी गणेशोत्सवाच्या काळात अन्सारी याने फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित करून त्यात श्री गणेशाच्या चित्रासमवेत श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केले होते. यात लिहिले होते ‘गणेशाची पूजा करतांना कुत्रा.’ एक कुत्रा मूर्तीला चाटतांना दाखवले होते. यावरून त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

या अवमानाची माहिती मिळाल्यावर वलसाड शहरातील गोरक्षकांनी अन्सारीच्या दुकानावर जाऊन विरोध केला, तसेच त्याला चपलांचा हार घालत त्याची वरात काढली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारी याला अटक केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *