Menu Close

मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्यासाठी सुट्यांची वेगवेगळी सूची – शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

  • बिहारमधील शाळांतील हिंदु सणांच्या सुट्या रहित केल्याचे प्रकरण

  • राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची वेगवेगळी सूची

  • बिहार सरकारवर हिंदुद्रोहावरून टीका होऊ लागल्यामुळेच सरकारकडून अशा प्रकारची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे स्पष्ट आहे ! सरकारने कितीही स्पष्टीकरण दिले, तरी राज्यातील संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार हिंदुद्रोही आणि मुसलमानप्रेमी आहे, हे जगजाहीर आहे ! अशा सरकारला राज्यातील जनतेने मतदानाद्वारे धडा शिकवणे आवश्यक आहे !
  • धर्मनिरपेक्ष देशात धर्मानुसार वेगवेगळ्या सुट्या कशासाठी ? असे प्रकार टाळण्यासाठी देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे ! -संपादक 

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळांतील वार्षिक सुट्यांची सूची प्रसारित केली होती. यात हिंदूंच्या सणांच्या काही सुट्या रहित करून इस्लामी सणांच्या सुट्यांमध्ये वाढ करण्यात आल्याचे दिसून आले होते. यावरून सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या. एक मुसलमानांसाठी, तर दुसरी मुसलमानेतरांसाठी. प्रसारमाध्यमांमध्ये मुसलमानांसाठीच्या सूचीचेच वृत्त प्रकाशित झाले. या सूचीमध्ये त्यांच्यासाठी मुसलमानेतरांच्या सणांच्या सुट्या अल्प केलेल्या आहेत. मुसलमानेतरांसाठीच्या सूचीमध्ये असे करण्यात आलेले नाही. तेथे मुसलमानांच्या सुट्या अल्पच आहेत. थोडक्यात उर्दू शाळांसाठी सुट्यांची वेगळी सूची आणि सरकारी शाळांना सुट्यांची वेगळी सूची बनवल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

१. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे सुट्यांच्या २ सूची प्रसारित करण्यात आल्या. यापूर्वी एकच सूची प्रसारित करण्यात येत होती.

२. या सूचीनुसार मुसलमानेतरांना गुरु गोविंद सिंह जयंती, प्रजासत्ताकदिन, वसंत पंचमी, संत रविदास जयंती, शब-ए-बरात, महाशिवरात्री, बिहार दिवस, होळी, गुड फ्राइडे, ईद-उल-फितर, आंबेडकर जयंती, १ महिना दिवाळीची सुटी, जानकी नवमी, बौद्ध पौर्णिमा, ईद-उल-जोहा, कबीर जयंती, मोहरम, १५ ऑगस्ट, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्रोत्सव, दीपावली, छठपूजा, नाताळ आदींचा समावेश आहे.

३. मुसलमानांच्या शाळांसाठी महाशिवरात्री, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरितालिका आणि जानकी नवमी यांच्या सुट्या देण्यात आलेल्या नाहीत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *