गुजरात उच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावण्यावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली !
मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे. न्यायालयाने याकडेही लक्ष द्यावे, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे ! -संपादक
कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयाने बजरंग दलाच्या नेत्याने प्रविष्ट केलेले मशिदींवर भोंगे लावण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले. न्यायालयाने ‘मशिदींवरील भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण होत नाही’, असे सांगितले. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्यांना विचारले की, पहाटे मंदिरात आरती होती. ही आरती पहाटे ३ वाजता ढोल आणि संगीत याद्वारे होते. त्यामुळे गोंगाट होत नाही का ? तुम्ही असे सांगू शकता की, घंटेचा आवाज केवळ मंदिर परिसरातच रहातो ? तो मंदिराबाहेर जात नाही ? आम्ही अशा प्रकारच्या याचिकेवर सुनावणी करणार नाही. मशिदींवरील भोंगे अनेक वर्षांपासून आहेत. अजान केवळ ५-१० मिनिटांसाठीच असते.
सौजन्य लाईव हिंदुस्तान
स्रोत: दैनिक सनातन प्रभात