-
महंमद पैगंबर यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कारवाई !
-
विश्वविद्यालय परिसरात मुसलमानांचे आंदोलन, सामाजिक माध्यमांवरूनही विरोध !
- धर्मांध मुसलमानांनी विरोध केल्यानंतर आरोपी हिंदु विद्यार्थ्याला बडतर्फ केले जाणे, यासाठी काश्मीर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
- हिंदूंच्या देवी-देवतांच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने गरळओक करत आहेत, तर त्यांच्या विरोधात अशा प्रकारची कोणतीच कारवाई का होत नाही ? ‘हिंदूंमधील अतीसहिष्णुतेचाच हा परिणाम आहे’, असे एखाद्याला वाटून त्याने मुसलमानांसारखे हिंसक होण्याचा विचार केल्यास त्याच्या या कृत्याला भारतीय व्यवस्था कुणाला उत्तरदायी धरणार ? -संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील ‘एन्.आय.टी. श्रीनगर’मध्ये शिकणार्या एका हिंदु विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून विश्वविद्यालयाच्या परिसरात मुसलमान विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या वेळी ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ (अल्ला, आम्ही तुझ्यासाठी उपस्थित आहोत) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला हमास समर्थक, तसेच पाकिस्तानी क्रिकेपटूंचे ‘प्रोफाईल फोटो’ असलेल्यांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांवरूनही प्रसारित करण्यात आले. यावरून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. विश्वविद्यालय प्रशासनाने तर आरोपी विद्यार्थ्याला बडतर्फ केले असून पुढील सर्व ‘सेमिस्टर्स’साठी (परिक्षांसाठी) अपात्र घोषित केले आहे. ही संपूर्ण घटना २८ नोव्हेंबर या दिवशी घडली.
१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हिंदु विद्यार्थ्याने त्याच्या व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम खात्यांच्या ‘स्टेटस’वर महंमद पैगंबर यांच्या संदर्भात एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला आहे. अनेकांनी मात्र हा व्हिडिओ हमासच्या संस्थापकाच्या मुलाचा असल्याचे म्हटले आहे.
२. ‘हिंदु विद्यार्थ्याने केवळ वरील व्हिडिओ प्रसारित केला म्हणून नव्हे, तर त्याची प्रेयसी मुसलमान विद्यार्थिनी असल्याने श्रीनगरमधील कट्टरतावादी मुसलमानांचा आरोपी विद्यार्थ्यावर रोष आहे’, असे म्हटले जात आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात