‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान
नांदेड (महाराष्ट्र) – सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच्.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची भाषा देशात काही दिवसांपूर्वी सनातन धर्मद्वेष्ट्यांकडून करण्यात आली. महाराष्ट्रात याविषयी आतापर्यंत १२१ ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या; पण अजूनपर्यंत कुठेही त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिवक्ता जगदीश हाके यांनी सांगितले की, नांदेडमध्येसुद्धा पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले; पण ती प्रविष्ट करून घेतली गेली नाही.
‘सनातन धर्माच्या विरोधात जे षड्यंत्र चालू आहे, त्याच्या विरोधात संघटितपणे लढा देऊ’, असे ‘श्रीराम जन्मोत्सव समिती’चे श्री. गणेश ठाकूर यांनी सांगितले.
सनातन धर्मरक्षक अभियान या विषयावर समाजात जागृतीसाठी नांदेड येथे दुपारी व्यापार्यांची बैठक आणि सायंकाळी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर यांनी सांगितले.