Menu Close

इस्लाम स्वीकारा किंवा मरायला सिद्ध व्हा – बेंगळुरूमधील १५ खासगी शाळा बाँबने उडवण्याची धमकी

  • पोलिसांच्या तपासणीनंतर अफवा असल्याचे उघड !

  • वर्ष २०२२ मध्येही अशी देण्यात आली होती धमकी !

  • ही अफवा असल्याचे पूर्वी आणि आताही सिद्ध झाले असले, तरी पुढच्या वेळी पुन्हा अशी धमकी आल्यास विद्यमान काँग्रेस सरकार आणि पोलीस त्याकडे गांभीर्याने पहाणार नाहीत आणि त्या वेळी खरेच बाँब ठेवले जातील, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये !
  • काँग्रेस सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. हा खोडसाळपणा आहे कि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून पुढे मोठा घातपात करण्याचा प्रयत्न आहे ?, हे जनतेच्या समोर आले पाहिजे ! -संपादक 

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या सर्व शाळांना १ डिसेंबरला एकाच वेळी हा मेल प्राप्त झाला. यात शाळांमध्ये बाँब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. याविषयी शाळांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढून शोधप्रारंभ केला. बाँब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोचले; मात्र काहीही सापडले नाही. या शाळांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते, ‘तुमच्याकडे आमचे गुलाम बनण्याचा किंवा अल्लाचा खरा धर्म स्वीकारण्याचा पर्याय आहे. आम्ही अल्लाचा खरा धर्म भारतभर पसरवू. इस्लामचा स्वीकार करा किंवा इस्लामच्या तलवारीने मान कापून घ्या. जेव्हा आम्ही काफिरांना भेटू, तेव्हा त्यांचे डोके आणि बोटे कापून टाकू.’

१. या ई-मेलमध्ये पुढे म्हटले होते की, २६ नोव्हेंबरला अल्लाच्या मार्गात हुतात्मा झालेल्यांनी शेकडो मूर्तीपूजकांना मारले. स्वतःच्या हातात चाकू धरून काफिरांवर आक्रमण करणे, हा खरोखर एक शक्तीशाली अनुभव आहे. शेकडो मुजाहिदीन अल्लाच्या मार्गात हुतात्मा होण्यासाठी युद्धक्षेत्रात जात आहेत. तुम्ही अल्लाचे शत्रू असून आम्ही तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मारून टाकू.

२. विशेष म्हणजे वर्ष २०२२ मध्ये बेंगळुरूच्या १५ शाळांना असाच ई-मेल आला होता. ‘शाळेच्या आवारात स्फोटके पेरण्यात आली होती’, अशी धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने या शाळांची कसून चौकशी केली; मात्र कुठेही काहीही आढळून आले नाही. नंतर कळले की, ही काही माथेफिरूंची खोड होती.

३. आताच्या धमकीविषयी बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, सर्व शाळा शहराच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. काहीही संशयास्पद आढळलेले नाही. बाँबची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मुलांना घेण्यासाठी आले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी बेंगळुरूमधील ७  शाळांना अशाच प्रकारे धमक्या मिळाल्या होत्या; परंतु त्याही अफवा होत्या.

४. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शाळेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, दूरचित्रवाणीवर शाळेत बाँबची बातमी पाहून मी घाबरलो. धमक्या आलेल्या काही शाळा माझ्या घराजवळ आहेत. पोलिसांनी मला ई-मेल दाखवला आहे. हे बनावट दिसते. काही भंपक लोकांनी हे कृत्य केले असावे. आम्ही त्यांना २४ घंट्यांत पकडू.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *