सोलापूर (महाराष्ट्र) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित युवतींना स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धती शिकवण्यात आल्या. शिबिरामध्ये हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, भारताचा शौर्यशाली इतिहास आणि महिलांची सद्य:स्थिती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. धनंजय बोकडे आणि श्री. मिनेश पुजारे यांनी उपस्थितांना शिबिराचा उद्देश स्पष्ट केला, तर कु. श्रद्धा सगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या युवतींनी मनोगत व्यक्त केले.
मनोगत
श्रद्धा देगावकर – ‘शिबिरातील विषय ऐकल्यानंतर प्रत्येक निद्रिस्त हिंदु जागा झाला पाहिजे’, असे वाटले. प्रत्येक हिंदु युवती अशा प्रकारच्या शिबिरात सहभागी झाली, तर यापुढे श्रद्धा किंवा साक्षी यांसारखी प्रकरणे घडणे बंद होईल.