‘दारा शिकोह फाऊंडेशन’ संस्थेची संयुक्त राष्ट्रांकडे पाकच्या विरोधात तक्रार !
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना तोडण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच या मंदिरांचे रक्षण करण्याचे दायित्व पाक सरकारकडून काढून स्वत:कडे घ्यावे, असा आग्रहही केला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष महंमद आमिर राशिद यांनी हे पत्र लिहिले असून त्यात २६/११ च्या तिथीलाच मुद्दामहून भारतियांच्या आणि प्रामुख्याने हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी पाक सरकारने ‘शारदा पीठा’ची भिंत कोणताही न्यायालयीन आदेश नसतांना पाडली.
‘दारा शिकोह फाऊंडेशन’ने पत्रात पुढे म्हटले आहे की…,
१. पाक सरकार मुद्दामहून हिंदु मंदिरांना लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी सैनिकांसाठी तेथे कॉफी हाऊस बांधता यावे, यासाठी त्याने कोणताही विचार न करता शारदा पीठाची भिंत पाडून टाकली.
२. पाकच्या नीलम खोर्यात असलेले शारदा पीठात हिंदु मंदिराचे शिल्लक अवशेष आहेत, तसेच ते शिक्षणाचे प्राचीन केंद्र आहे.
३. युनेस्कोच्या महानिर्देशकांनी पाक सरकारच्या विरोधात कठोर कार्रवाई करावी.
४. युनेस्कोच्या नेतृत्वाखाली शारदा पीठाचे पुनर्वसन आणि पुनरुद्धार झाला पाहिजे.
५. अशाच प्रकारे पाकिस्तानी सरकारने पाकव्याप्त काश्मिरातील हिंगलाजमाता मंदिरही पाडले. गेल्या ३-४ आठवड्यांत सरकारी आदेशांच्या अंतर्गत अशा प्रकारे अनेक मंदिरांना पाडण्यात आले.
६. पाकिस्तान सरकारच्या असहिष्णुतेचा हा केवळ एक नमुना आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात