शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब परिधान करून न येण्यास सांगितल्याचा परिणाम !
- शाळेच्या नियमांचे पालन न करणार्या अशा विद्यार्थिनींना शाळेतून काढून टाकण्याचे धाडस दाखवणे आवश्यक आहे !
- मुसलमानबहूल जम्मू-काश्मीरच्या ‘एन्.आय.टी. श्रीनगर’ विश्वविद्यालयात एका हिंदु विद्यार्थ्याने इस्लामचा कथित अवमान केल्यावरून त्याला बडतर्फ केले जाते, तर हिंदुबहूल बिहारमध्ये मुख्याध्यापकाला ठार मारण्याची धमकी देणार्यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नाही, हे हिंदुबहूल भारतासाठी लांच्छनास्पद ! -संपादक
शेखपुरा (बिहार) – येथील उत्क्रमित मध्य विद्यालय चरुआवां या शाळेतील मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने धर्मांध मुसलमान शाळेत घुसले. त्यांनी चौधरी यांना शाळेला टाळे ठोकून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक चौधरी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि अन्य पदाधिकारी यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिक्षण संघाने मुख्याध्यापकांसह शाळेचे संरक्षण करण्यासाठी तत्परतेने कृती करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी ओम प्रकाश सिंह यांनी सांगितले की, हे गंभीर प्रकरण आहे आणि शाळेच्या गणवेशानुसार विद्यार्थिनींनी येणे आवश्यक आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश स्थानिक शिक्षणाधिकार्यांना देण्यात आला आहे. येथील अधिकारी रमेश प्रसाद यांना दोन्ही पक्षांची बैठक घेण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मुख्याध्यापक चौधरी यांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहे.
गणवेशासाठी विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळतात पैसे !
या शाळेत मुसलमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठी संख्या आहे. त्यांना सरकारी योजनेच्या अंतर्गत गणवेशासाठी सरकारकडून पैसे देण्यात येतात. असे असले, तरी मुसलमान विद्यार्थिनी बुरखा आणि हिजाब परिधान करून शाळेत येतात. (सरकारकडून गणवेशासाठी पैसे घ्यायचे आणि वर गणवेश परिधान न करता बुरखा आणि हिजाब घालायचे, हा गुन्हा आहे. यावरून संबंधितांवर पोलिसांत गुन्हा नोंदवला पाहिजे ! – संपादक)
आमच्या मुलांनी काय परिधान करावे, हे सांगणारे मुख्याध्यापक कोण ? – माजी सरपंच महंमद अस्लम यांची दर्पोक्ती
अशा प्रकारची धमकी देणारे माजी सरपंच अद्याप कारागृहाबाहेर कसे ? अशांना तात्काळ कारागृहात डांबून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
येथील गावाचे माजी सरपंच महंमद अस्लम यांनी सांगितले की, आमच्या मुलांनी काय परिधान करावे, हे सांगणारे मुख्याध्यापक कोण आहेत ? या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकार्यांची भेट घेऊन सर्व स्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. आम्ही त्यांना हेही सांगितले आहे की, बुरखा आणि हिजाब परिधान करणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. यात पालट करण्याचा प्रयत्न करणे अनावश्यक आहे. जर कुणी यात पालट करत असेल, तर आम्ही शाळेला टाळे ठोकू, अशी धमकी त्यांनी दिली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात