Menu Close

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर ओतले

  • गाझियाबाद (उत्तरप्रदेश) होली ट्रिनिटी चर्च स्कूलमधील घटना

  • पालक आणि बजरंग दल यांच्या विरोधानंतर शिक्षिकेची हकालपट्टी

चर्चच्या शाळेत याहून काही वेगळे घडणार नाही. त्यामुळेच हिंदूंनी आता हिंदूंसाठी हिंदु धर्मानुसार शिक्षण देणार्‍या शाळा चालू करण्याची आवश्यकता आहे ! हिंदु राष्ट्रांत अशा शाळा असतील ! -संपादक 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील गोविंदापूरम्मधील होली ट्रिनिटी चर्च स्कूल या शाळेत एका विद्यार्थ्याने पटलावर (डेस्कवर) ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी या विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर थिनर (रंगकामासाठी वापरण्यात येणारे प्रकारचे द्रव) ओतले. यामुळे हा विद्यार्थी घरी जाऊन एकटाच खोलीत ४५ मिनिटे रडत राहिला. पालकांना घटनेची माहिती मिळताच ते आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते शाळेत पोचले अन् त्यांनी शिक्षिकेची हकालपट्टी करण्याची मुख्याध्यपकांकडे मागणी केली. या वादानंतर मुख्याध्यापिका मधुलिका जोसेफ यांनी शिक्षिका मनीषा मेसी यांना कामावरून काढून टाकले आहे.

१. या प्रकरणी शिक्षिका मनीषा मेसे यांनी क्षमापत्र लिहून मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यात लिहिले आहे की, मी माझ्या कृतीसाठी क्षमा मागू इच्छिते. विद्यार्थी माझ्याशी गैरवर्तन करत होता; म्हणून मी द्रव ओतले. मी तुम्हाला निश्‍चिती देते की, मी भविष्यात असे करणार नाही.

२. बजरंग दलाचे महानगर संयोजक गौरव कुमार सिंह म्हणाले की, ‘जय श्रीराम’ म्हणणे किंवा लिहिणे हा गुन्हा कधीपासून झाला आहे ? अशा मानसिकतेचे शिक्षक कोणत्याही शाळेत असल्यास मुलांच्या भविष्यावर परिणाम होणार.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *