Menu Close

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

मालविका अविनाश

पुत्तुरू (कर्नाटक) – लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले. शहराच्या तेंकिल येथे ‘पुत्तूरू जिल्हा महिला संमेलना’त त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की,

१. लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरित झालेल्या तरुणींनी त्यांच्या भविष्याविषयी गांभीर्याने विचार करावा. हिंदु धर्मात ‘एक पत्नी’ अशी पद्धत आहे. महिलांना पतीसह समान हक्क आहे; परंतु इस्लाम धर्मात बहुपत्नीत्व पद्धत आहे.

२. अन्य धर्मीयांशी विवाह करणारी हिंदु युवती तिचा समान हक्क अधिकार गमावते. एवढेच नव्हे, तर बहुपत्नीत्व असल्याने तिला एकांगी आणि एकटेपणाचे जीवन जगणे अनिवार्य होते.

३. ‘तू इस्लाम स्वीकारलास, तरच तुझ्यावर प्रेम करीन,’ असे युवक म्हणतात. हे कसले प्रेम ? याचा प्रत्येक तरुणीने अर्थ समजून घ्यावा.

४. भारतीय तत्त्वज्ञानात वेदकाळापासून पुरुष-महिला असा भेद नाही. हिंदु धर्मात इतरांनी सुधारणा केली नाही. उलट धर्मातील लोकांनी समाजात सुधारणा केली आहे. संस्कृती आणि संस्कार नष्ट करून समानता साधण्याचा उद्देश हिंदु धर्मात नाही.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *