हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे धर्मांध शिक्षिकेने मागितली क्षमा !
- हिंदु विद्यार्थ्यांना धर्मानुसार कृती करण्यास विरोध करणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील ? हे पालकांनी पहावे !
- हिंदु धर्माच्या विरोधात बोलणार्यांना क्षमा मागायला लावणार्या सतर्क हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
- केवळ हिंदु धर्मानुसार कृती करण्यास विरोध करत, हिंदु धर्मातील परंपरा जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या अशा धर्मांध शिक्षिकेवर कठोर कारवाई करायला हवी ! -संपादक
सासवड (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – येथील गावातील आणि पंचक्रोशीतील काही महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची ९ डिसेंबर या दिवशी ‘पुरंदर ज्युनिअर कॉलेज सासवड’ याविषयी तक्रार आली होती. या महाविद्यालयातील जे विद्यार्थी कपाळावर टिळा लावून जात होते त्यांना महाविद्यालयामधील काझी या शिक्षिकेने, ‘तुम्ही टिळा का लावता ?, तुम्ही दोन दोन घंटे रांगेत उभे राहून दर्शनाला का थांबता ? तुम्ही दगडाच्या पाया पडू नका’, असे हिंदु धर्माविषयी अनेक प्रश्न आणि विधाने या शिक्षिकेने वर्गामध्ये केली. हे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त वेगळे प्रश्न होते, हे लक्षात येताच या गावातील हिंदु संघटनेचे कार्यकर्ते संतोष खेडेकर, जीवन खेडेकर आणि विशाल खेडेकर, सागर मोकाशी, तसेच अन्य तरुण यांनी ११ डिसेंबरला त्वरित महाविद्यालयात जाऊन सदर महाविद्यालयाचे प्राचार्यांना भेटले. त्यांच्यासमोर त्या शिक्षिकेने धर्माविषयी केलेले हे वक्तव्य कसे चुकीचे आहे, हे सिद्ध केले. त्या शिक्षिकेला त्याच विद्यार्थ्यांसमोर चुकीच्या केलेल्या वक्तव्यावर क्षमा मागायला, तसेच ‘यानंतर कोणत्याही धर्माविषयी मी असे वक्तव्य करणार नाही’, असे जाहीरपणे सांगायला भाग पाडले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात