Menu Close

भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला ! – आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

महाराष्ट्राच्या विधानसभेतही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

नागपूर (महाराष्ट्र) : आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे आक्रमण आहे. त्यामुळे ‘मांस-मटण वगळता महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी’, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. माहितीच्या सूत्राअंतर्गत (पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन) याविषयी आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. याविषयीची माहिती देणारी कागदपत्रे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सादर केली.

‘हलाल प्रमाणपत्र देणार्‍या या आस्थापनांनी अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांना आर्थिक साहाय्य केले आहे. या आस्थापनांच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती आहे. जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपींना या आस्थापनांकडून आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. उत्तरप्रदेश शासनाने १८ नोव्हेंबर २०१३ या दिवशी हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई व्हावी. कपडे आणि मटण-मांस वगळता अन्य खाद्यपदार्थांवर हलाल शिक्क्याची आवश्यकता काय ?’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदीची मागणी केली.

१२ डिसेंबर या दिवशी शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे, आमदार संतोष बांगर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार बालाजी कल्याणकर आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *