Menu Close

(म्हणे) ‘संसदेत घुसखोरी करणारे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात धार्मिक उन्माद माजवला असता !’- जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांचा भाजपवर फुकाचा आरोप

भाजपने कथित उन्माद माजवला असता, तर ललन सिंह यांच्यासह अन्य ढोंगी निधर्मीवादी पक्षांनी या मुसलमानांची बाजू घेत त्यांना निरपराध ठरवण्याचा प्रयत्न केला असता. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा केली असती, तरीही या पक्षांनी फाशी रहित करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला असता ! -संपादक 

जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

पाटलीपुत्र (बिहार) – जे २ लोक संसदेत घुसले ते मुसलमान नव्हते, यासाठी मी देवाचे आभार मानतो. हे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात आणि जगात वादळ निर्माण केले असते. भाजपवाल्यांनी देशभर धार्मिक उन्माद मरजवला असता, असे विधान बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी संसदेत झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणावरून केले. घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अमोल शिंदे, नीलम आझाद, सागर शर्मा, मनोरंजन गौडा, ललित झा आणि महेश यांना अटक केली आहे. या खेरीज पोलिसांनी विशाल आणि त्याची पत्नी यांना गुरुग्राममधून कह्यात घेतल्यानंतर चौकशी करून सोडून दिले. संसदेत घुसखोरीपूर्वी हे सर्व जण विशाल यांच्या घरी थांबले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *