प्रसाद देसाई यांची हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार
अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? -संपादक
हुपरी (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) – सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात दिलेल्या निकालात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही प्रकारचा ध्वनीक्षेपकाचा आवाज होता कामा नये, असे आदेश दिले आहेत. या आदेशाची कार्यवाही मशिदींवरील भोंग्याविषयी कोठेही दिसून येत नाहीत. अनेक ठिकाणी न्यायालयांच्या आदेशाची पायमल्ली करत पहाटे ५ ते सकाळी ६ या कालावधीत अजान देण्यात येते. तरी हुपरी परिसरातील अवैध मशिदी / दर्ग्यावरील भोंग्यांमुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे, ते भोंगे काढावेत, तसेच अशा पद्धतीने गुन्हे करणार्या संबंधित गुन्हेगारांवर खटला प्रविष्ट करून त्यांना शिक्षा व्हावी, या मागणीची तक्रार हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रसाद देसाई यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली. ही तक्रार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी स्वीकारली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहरप्रमुख श्री. हृषिकेश साळी, शिवधर्म फाऊंडेशनचे श्री. उमेश लोंढे, बजरंग दलाचे श्री. अभिजित माणकापुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन वाडकर, श्री. संदीप शिदनुर्ले, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रसाद देसाई, संभाजी काटकर, रोहित माळी, निखिल कोंडेकर, अविनाश बागल यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.