Menu Close

गोवा : स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

७ धर्मांधांना अटक : मडगाव परिसरात तणाव

बजरंग दलाचे कार्यकर्ते साईश राजाध्यक्ष (डावीकडील) यांच्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण

मडगाव, १७ डिसेंबर (वार्ता.) : जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांधांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली. यासंंबंधी बजरंग दलाचे नेते विराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मडगाव येथील स्मशानभूमीत घडली.

या स्मशानभूमीत एक व्यक्ती कचरा आणून टाकत असतांना त्याला बजरंग दलाचे कार्यकर्ते साईश राजाध्यक्ष यांनी खडसावले. तेव्हा त्या व्यक्तीने जमाव जमवून साईश राजाध्यक्ष यांच्यावर खुनी आक्रमण केले. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अफझल शेख, जाफर खान, नासीर शेख, निजाम बी., जाफर बी. आदी ७ जणांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत फातोर्डा पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमली होती. या वेळी हिंदू मठग्रामस्थ स्मशानभूमीचे मार्गदर्शक भाई नायक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

बजरंग दलाचे नेते विराज देसाई म्हणाले, ‘‘कचरा टाकल्याबद्दल साईश यांनी विचारले; म्हणून त्यांच्यावर खुनी आक्रमण होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा चालू आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेची सखोल चौकशी आणि योग्य तर्‍हेने न्याय मिळणार नसेल, तर आमच्या कार्यकर्त्यांपैकी एकही जण पोलीस ठाण्यातून हलणार नाही. आम्ही देव, देश, धर्म आणि राज्यघटना यांकडे पाहून चालणारे आहोत.’’

संदर्भ : सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *