250 हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती
हलाल अर्थव्यवस्था भारताला खिळखिळी करत आहे – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
यवतमाळ – हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी समांतर होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमलेल्या पैशांतून देशविरोधी कारवायांना साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहे. हलाल अर्थव्यवस्था भारताला खिळखिळी करत आहे; म्हणूनच हलाल अर्थव्यवस्थेचे धोके लक्षात घेऊन उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र आणि व्यवहार यांवर संपूर्ण राज्यात बंदी आणली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेसुद्धा हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केली. नुकत्याच घाटंजी येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त ते बोलत होते.
कुटुंब व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण वाढले ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, रणरागिणी शाखा
कुटुंबव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण वाढले आहे. साधना आणि धर्माचरण करून महिलांनी धर्माच्या क्षेत्रात पुढे जायला हवे. क्षात्रतेज अंगीकारणार्या राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्याप्रमाणे आजच्या महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले.