Menu Close

बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या संबंधित कट्टरतावादी गटाने रथींद्र नाथ रॉय या हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी बेकायदेशीररित्या कह्यात घेतली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही घटना हितबंध उपजिल्ह्यातील पारूलिया गावातील आहे. धर्मांधांकडून या कुटुंबाला धमकी देण्यासह त्यांच्यावर आक्रमण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

१. येथील ‘द डेली स्टार’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भूमीवर नियंत्रण मिळवणार्‍यांमध्ये अवामी लीगचा नेता हफीजुल इस्लाम, अबुल कलाम, हजरत अली आणि रेदवान अहमद यांचा समावेश आहे. हफीजुल हा पतिकपारा प्रभागाचा अध्यक्ष आणि अबुल सरचिटणीस आहे.

२. पोलीस अधिकारी शाह आलम यांनी सांगितले की, आमच्याकडे भूमीवर अवैध नियंत्रण मिळवल्याची तक्रार आली आहे. हे भूमीविषयीचे प्रकरण असल्याने स्थानिक स्तरावर सोडवण्यासाठी पतिकापरा युनियन परिषदेच्या अध्यक्षांना सांगण्यात आले आहे.

३. परिषदेचे अध्यक्ष मजीबुल आलम यांनी म्हटले की, रथींद्र रॉय यांच्या तक्रारीची चौकशी करून ती खरी असेल, तर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *