Menu Close

सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांचा ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाकडून सत्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांचा सत्कार करतांना ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाचे जाहिरात व्यवस्थापक उदय खाडीलकर

सातारा – येथील बेळगाव ‘तरुण भारत’च्या वतीने सातारा आवृत्तीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी विविध संघटनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

येथील हॉटेल राधिका पॅलेसच्या लॉनवर हा स्नेहमेळावा पार पडला. कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, माजी आमदार दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, संपादक जयवंत मंत्री, आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *