Menu Close

देशातील प्रत्येक मंदिरात १४ ते २२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता अभियान राबवा !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना आवाहन !
  • अयोध्यानगरी प्रतिदिन स्वच्छ ठेवण्याचे दायित्व अयोध्यावासियांचे असल्याचेही सुतोवच !

नवी देहली : पंतप्रधान मोदी यांनी आयोध्यानगरी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ‘इन्टाग्राम’वर एक व्हिडिओ प्रसारित करून केले आहे. यात त्यांनी ‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे. हे अभियान १४ ते २२ जानेवारी या कालावधीत राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.

(सौजन्य : India Today)

प्रभु श्रीरामांचे आगमन होत असतांना एकही मंदिर आणि तीर्थक्षेत्र अस्वच्छ राहू नये !

पंतप्रधानांनी अयोध्येतील नागरिकांना म्हटले की, आता देश-विदेशांतून प्रतिदिन मोठ्या संख्येने लोक येत रहाणार आहेत. त्यामुळे अयोध्यावासियांनी एक संकल्प केला पाहिजे की, रामनगरी देशातील स्वच्छ शहर बनवणार. स्वच्छ अयोध्या बनवण्याचे दायित्व अयोध्यावासियांचे आहे. प्रभु श्रीराम सर्वांचे आहेत. भगवान श्रीरामांचे आगमन होत असतांना आपले एकही मंदिर आणि तीर्थक्षेत्र अस्वच्छ राहू नये.

संदर्भ : सनातन प्रभात मराठी

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *