Menu Close

पावनगड (कोल्हापूर) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाकडून भुईसपाट !

वर्ष १९७९ मध्ये बांधला होता अनधिकृत मदरसा !

या कारवाईसाठी सरकारचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या गड-दुर्गांवर अवैध बांधकामे किंवा अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवून गड-दुर्ग मुक्त करावेत, अशी गडप्रेमींची अपेक्षा ! – संपादक, हिंदु जनजागृती समिति

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण केली. प्रशासनाने या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळली होती, तसेच या ठिकाणी ४०० पोलिसांचा  बंदोबस्त ठेवला होता. या संदर्भात बजरंग दलाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.

१. पावनगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. वर्ष १९७९ मध्ये एका धर्मांधाने येथे हा अवैध मदरसा बांधला. सद्यःस्थितीत या ठिकाणी पश्‍चिम बंगाल आणि बिहार येथील ४५ मुसलमान मुलांना शिक्षण दिले जात होते.

२. ४ जानेवारीला येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरशात नेण्यात आले. नंतर ही कारवाई करण्यात आली. हा मदरसा अनुमाने २ गुंठे क्षेत्रात बांधण्यात आला होता.

३. सध्या गडावर १४४ कलम लागू करण्यात आले असून अतिक्रमणानंतरचे पडलेले साहित्य उचलण्याचे काम चालू आहे. सध्या गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

४. या कारवाईविषयी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाधान व्यक्त केले असून ‘कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गड-कोट, तसेच अन्य ठिकाणांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत’, अशी मागणी केली आहे.

५. बजरंग दलाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. सुरेश रोकडे म्हणाले, ‘‘या संदर्भात बजरंग दलाने दोन वेळा प्रशासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली.  ‘या गडावर अनधिकृत मदरसा असून त्या ठिकाणी महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी आहेत. येथे ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करत काही घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे’, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली होती.’’

पावनगडावरील अतिक्रमण हटवल्याविषयी अभिनंदन ! अशीच कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणावर लवकर व्हावी ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती

प्रशासनाने पावनगडावरील अतिक्रमण हटवले, त्याविषयी अभिनंदन ! शासनाने यापूर्वी प्रतापगड आणि संग्रामगड येथील अतिक्रमणेही हटवली आहेत. नुकतेच माहिमगड येथील अतिक्रमणही हटवले आहे. महाराष्ट्रात अजूनही ३०-३५ गडांवर अतिक्रमण असून ही अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया जलदगतीने होणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात ठोस कृती होत नसून प्रारंभी पावसाळा असल्याने अतिक्रमण हटवले न जाणे आणि आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते हटवले न जाणे, असे होत आहे. तरी सरकारने विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता नेमून ज्या ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या तात्काळ कराव्यात.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *