हिंदूंकडून सरे शहरात निदर्शने !
ओटावा (कॅनडा) – कॅनडातील सरे शहरामध्ये हिंदु समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेवरून निदर्शने केली. येथील हिंदूंना मिळत असलेल्या खंडणीसाठीच्या धमक्यांवरून ही निदर्शने करण्यात आली. याचे आयोजन ‘वैदिक हिंदु कल्चरल सोसायटी’कडून करण्यात आले होते.
Canadian Hindus are facing death threats and extortion attempts !
Hindu protests in Surrey !
India should now declare Canada as a 'country unsafe for Hindus' and ban the travel of Indians to Canada !
DETAILS : #Ottawa (#Canada) – Hindus in Canada's Surrey city took out… pic.twitter.com/8oI5zieEnm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2024
१. येथील लक्ष्मी नारायण मंदिर समितीचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितले की, खंडणीसाठी मिळणार्या धमक्यांमुळे हिंदु समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांना धमक्या मिळाल्या आहेत. काही जणांनी तर धमक्या मिळाल्यानंतर खंडणी दिली आहे.
२. काही दिवसांपूर्वी सतीश कुमार यांच्या मुलाच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता, तसेच काही आठवड्यांपूर्वी लक्ष्मी नारायण मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान्यांनी आक्रमण करून भारतविरोधी घोषणा लिहिल्या होत्या.
३. गेल्या वर्षी नोव्हेंबर मासामध्ये कॅनडाच्या पोलिसांनी खंडण्यांच्या प्रकरणी काही जणांना अटक केली होती; मात्र ‘ही कारवाई पुरेशी नाही’, असे हिंदूंचे म्हणणे आहे. ‘या धमक्यांमागे भारतीय टोळी आहे’, असे पोलिसांचे म्हणणे होते.