-
बहुतांश हिंदु मुलींकडून करवून घेतले जात होते ख्रिस्ती धर्माचे पालन !
-
सुधारगृहातून २६ मुली बेपत्ता !
-
पोलिसांकडून गुन्हा नोंद !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील ख्रिस्ती मिशनर्यांकडून बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्या खासगी बालिका सुधारगृहात असलेल्या ६८ मुलींपैकी २६ मुली बेपत्ता असल्याची माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांना मिळाली. यानंतर त्यांनी येथे धाड घातली. त्या वेळी तेथेत्यांना अनेक चुकीच्या गोष्टी आढळून आल्या.
अनाथ बेसहारा बच्चों को सरकारी एजेन्सी के रूप में रेस्क्यू कर के लाओ और ग्रूमिंग कर के धर्मपरिवर्तन को प्रेरित करो….
कुछ ऐसा ही है बड़वानी कलेक्टर के इस विज्ञापन का आशय !!!मध्यप्रदेश के भोपाल में अनाथ लड़कियों को गुपचुप ढंग से अवैध बाल गृह में रख कर ईसाई धर्म की प्रैक्टिस… pic.twitter.com/u10WKFYjHN
— प्रियंक कानूनगो Priyank Kanoongo (@KanoongoPriyank) January 7, 2024
याची माहिती त्यांनी ‘एक्स’वर प्रसारित केली आहे. या बालिका सुधारगृहात ६ ते १८ वयोगटातील मुली रहातात. यांतील बहुतांश मुली हिंदु आहेत. मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संदर्भात बालिका सुधारगृहाचे संचालक मॅथ्यू यांनी म्हटले की, बेपत्ता झालेल्या मुलींविषयी त्यांना कुठलीही माहिती नाही.
कानूनगो यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर सापडलेल्या अनाथ हिंदु मुलींना सरकारला कोणतीही माहिती न देता या सुधारगृहात आणून ठेवून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचे पालन करवून घेतले जात होते. या संदर्भात पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे. येथे ६ ते १८ वयोगटातील ४० हून अधिक मुली हिंदु आहेत.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात