Menu Close

वक्फ बोर्ड कायदा रहित करा – नितेश राणे, आमदार, भाजप

सोलापूर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा

सोलापूर – ९० टक्के हिंदू लोकसंख्या असणार्‍या भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लँड जिहाद, लव्ह जिहाद या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या न्यून करून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. त्यामुळे हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणारा वक्फ बोर्ड कायदा रहित करा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ६ जानेवारी या दिवशी सोलापूर येथे केली. सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी टी. राजासिंह, भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार तेलंगाणा, ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण हेही व्यासपिठावर उपस्थित होते.


हे वाचा – वक्फ बोर्डाचे अधिकार वाचून थक्क व्हाल !


नितेश राणे पुढे म्हणाले…

१. ‘भारत हिंदु राष्ट्र कधी होणार ?’, असा प्रश्‍न अनेकजण मला विचारतात. माझा भारत हिंदु राष्ट्रच आहे. येथील प्रत्येक इंच भूमी हिंदूंचीच आहे. देशातील हिंदू एकत्र येऊन रस्त्यावर उतरले, तर या दाढी कुरवाळणार्‍यांना क्षणार्धात चिरडून टाकतील. त्यामुळे हिरव्या सापांना मी एकच सांगीन, आमच्या नादी लागू नका. यापुढे हिंदु समाजावर अन्याय कराल, तर याद राखा !

२. ९० टक्के हिंदूंच्या देशात वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक भूमी आल्याच कशा ? वर्ष १९९५ मध्ये तत्कालीन सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केल्या. हा कायदा केवळ आपल्याच देशात आहे. इस्लाम मानणार्‍या एकाही देशात किंबहुना पाकिस्तान येथेही हा कायदा नाही. ज्या देशात ९० टक्के हिंदू रहातात, तेथे असा कायदा करून हिंदूंची लोकसंख्या न्यून करण्याचे षड्यंत्र आहे. हा कायदा आम्हाला मान्य नाही. तो तात्काळ रहित करावा.

३. या वक्फ बोर्डात एकही हिंदू नाही. सर्वजण मुसलमान आहेत. याविरोधात लढा देणे आवश्यक आहे. जेथे या बोर्डाची माणसे भूमी मागायला येतील, तेथे हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. हिंदू बांधवांनो, पेटून उठा !

४. त्यांचा अली असेल, तर आमचा बजरंगबली आहे, ही घोषणा कायम लक्षात ठेवा.

५. भारतात सीरिया आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे शरीयत कायदा लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हिंदूंनी वेळीच डोळे उघडले नाहीत, तर सोलापूरचे नाव हे लोक सलामपूर ठेवतील. त्यामुळे जागे व्हा !

नेहरूंमुळे फोफावलेल्या औलादींना वेळीच न खडसावल्यास भारताचे इस्लामिक राष्ट्र होईल ! – टी. राजासिंह, भाजपचे हिंदुत्वनिष्ठ खासदार, तेलंगाणा

महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या प्रकारे लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्डाचा अत्याचार वाढत आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट होणे आवश्यक आहे. या मोर्चाचा एकमेव उद्देश म्हणजे झोपी गेलेल्यांना जागे करणे; कारण जातीयवादामुळे हिंदु समाज विभाजित होत आहे. त्याचा अपलाभ घेतला जात आहे. कुणी तुम्हाला विचारले, ‘‘तुमची जात कोणती ?’’ त्यांना ताठ मानेने सांगा, ‘‘माझी जात हिंदु आहे.’’ सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मंदिराच्या भूमीवर वक्फवाल्यांनी दावा सांगितला आहे. नेहरूंमुळे फोफावलेल्या या औलादींना वेळीच न खडसावल्यास भारताचे इस्लामिक राष्ट्र झाल्यावाचून रहाणार नाही.

स्रोत : सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *