Menu Close

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अन्नपूर्णी’ चित्रपटात श्रीरामाचा अवमान, चित्रपटाच्या विरोधात पोलिसांत तक्रार

  • धर्मांध नायकाकडून भगवान श्रीराम मांसाहार करत असल्याचा उल्लेख !

  • चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

  • ब्राह्मण हिंदु तरुणी नमाजपठण करत बिर्याणी बनवत असल्याचा प्रसंग !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे आता सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, हिंदुजागृती

मुंबई – ‘अन्नपूर्णी’ या ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप, म्हणजे ‘अ‍ॅप’च्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आदी कार्यक्रम पहाणे) मंचावरून प्रसारित होणार्‍या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील नायक या मुलीला ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होते’, असे सांगत असल्याचे दिसत आहे. यावरून ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘झी स्टुडिओज’ यांच्या विरोधात ‘हिंदु आयटी सेल’ या संस्थेचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. रमेश सोलंकी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, जगभरात श्रीराममंदिरात श्री रामललाची प्रतिष्ठापना होण्याचा आनंद साजार केला जात असतांना ‘अन्नपूर्णानी’ हा हिंदुविरोधी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि ‘ट्रायटेंट आर्टस’ हे त्याचे निर्माते आहेत. यात अभिनेते (फरहान) अभिनेत्रीला मांस खाण्यासाठी प्रेरित करतांना ‘भगवान श्रीराम वनवासाच्या काळात मांस खात होते’, असे सांगत आहे, तसेच हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहे. हा चित्रपट श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या काळात यासाठीच प्रदर्शित केला गेला आहे, जेणेकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात.

२. सोलंकी यांनी तक्रारीमध्ये अभिनेते नीलेश कृष्णा, जय, जतिन सेठी, आर्. रवींद्रन्, पुनित गोएंका, शरीक पटेल आणि अभिनेत्री मोनिका शेरगलअन् नयनतारा यांचीही नावे नमूद केली आहेत.

३. या चित्रपटात एका हिंदु पुजार्‍याच्या मुलीचा प्रियकर मुसलमान तरुण असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात ब्राह्मण तरुणी ‘शेफ इंडिया’ या कार्यक्रमात सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे. येथे ती नमाजपठण करून बिर्याणी बनवत आहे. याविषयी ती म्हणते की, नमाजपठण करून बिर्याणी बनवल्याने त्याला चांगली चव येते.

स्रोत : सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *